Mukhyamantri Yojana Doot : प्रत्येक महिन्याला मिळणार 10000 रुपये

Mukhyamantri Yojana Doot : प्रत्येक महिन्याला मिळणार 10000 रुपये

मुख्यमंत्री योजना दूत (Mukhyamantri Yojana Doot ) ही योजना महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. योजना दूत हे स्थानिक पातळीवर काम करून ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना सरकारी योजना समजावून सांगतील आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देतील. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचवणे याकरीता 50000 मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे. योजना दूतांच्या मदतीने विविध सरकारी योजना आणि कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवणे. योजना दूत नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार योग्य योजना शोधण्यासाठी व त्यांचा लाभ घेण्यासाठी सहाय्य करतील. स्थानिक लोकसंख्येशी थेट संपर्क साधून, सरकारी योजनांची अंमलबजावणी सुधारली जाईल.

Mukhyamantri Yojana Doot Bharti Qualification : मुख्यमंत्री योजना दूत भरती पात्रता

  1. वयोमर्यादा : 18 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
  2. शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर उमेदवार असावा.
  3. संगणक ज्ञान : उमेदवाराला संगणकाचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
  4. अद्ययावत मोबाईल : उमेदवाराकडे अद्ययावत (स्मार्टफोन) मोबाईल असणे आवश्यक आहे.
  5. रहिवास : उमेदवार हा महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  6. आधार कार्ड आणि बँक खाते : उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, तसेच त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 : मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र : वर्षाला मिळणार 3000

Mukhyamantri Yojana Doot Apply Online : मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाइन अर्ज कसा करावा

Mukhyamantri Yojana Doot Apply Online : मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाइन अर्ज मेदवाराने महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. यामध्ये अर्ज करण्याची तारीख, आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया दिलेली असेल.

Mukhyamantri Yojana Doot Bharti Information : मुख्यमंत्री योजनादूत भरती प्रक्रियेची माहिती

Mukhyamantri Yojana Doot Bharti Information : मुख्यमंत्री योजनादूत भरती प्रक्रियेची माहिती खालील नियमांच्या पालनानुसारच योजनादूतांची निवड केली जाईल.

  1. नोंदणी आणि अर्जांची छाननी : उमेदवारांच्या नोंदणी आणि प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईन पूर्ण केली जाईल.
  2. छाननी प्रक्रियेतील पात्रता निकष : छाननी प्रक्रिया वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, संगणक ज्ञान इत्यादी निकषांनुसार केली जाईल.
  3. अर्जांची तपासणी : छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित अधिकारी आणि सहायक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार) यांना पाठवली जाईल.उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रांची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांद्वारे करण्यात येईल. यानंतर, उमेदवारांबरोबर 6 महिन्यांसाठी करार केला जाईल, जो वाढविला जाणार नाही.
  4. समुपदेशन व प्रशिक्षण (ओरिएंटेशन) : जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना सरकारी योजनांबद्दल समुपदेशन व प्रशिक्षण देण्यात येईल.
  5. योजनादूतांची नेमणूक : ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूत नेमला जाईल, तर शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत नेमला जाईल.
  6. शासकीय सेवा नसल्याबद्दल हमीपत्र : योजनादूत म्हणून करण्यात आलेली नियुक्ती शासकीय सेवा म्हणून मानली जाणार नाही. उमेदवारांकडून भविष्यात शासकीय सेवेत समावेश करण्याचा हक्क किंवा मागणी केली जाऊ नये, यासाठी हमीपत्र घेतले जाईल.
Mukhyamantri Yojana Doot : निवड झालेल्या योजनादूतांनी करावयाची कामे

निवड झालेल्या योजनादूतांनी नियम व शिस्तीचे पालन करून योजनादूतांनी शासकीय योजना प्रचारासाठी योगदान द्यावे.

  1. योजना संबंधित माहिती : योजनादूतांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती घ्यावी.
  2. कामकाजाचे पालन : नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन, ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक असेल.
  3. शासकीय योजना प्रचार : योजनादूतांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करताना, ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय साधावा. शासनाच्या योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
  4. दैनिक अहवाल : दररोज केलेल्या कामाचा विस्तृत अहवाल तयार करून, तो ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.
  5. जबाबदारीचा गैरवापर टाळणे : योजनादूतांनी सोपवलेल्या जबाबदारीचा गैरवापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा कोणत्याही नियमबाह्य कामासाठी करू नये. गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा गैरवर्तनाचे वर्तन आढळल्यास, करार संपुष्टात आणून जबाबदारीतून मुक्त केले जाईल.
  6. अनधिकृत गैरहजेरीचे परिणाम : अनधिकृतपणे अनुपस्थित राहिल्यास किंवा जबाबदारी सोडल्यास मानधन देण्यात येणार नाही.

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
close
Thanks !

Thanks for sharing this, you are awesome !